Wednesday, 16 June 2021

बदला (भाग २)

बदला

भाग २


            हा सर्व प्रकार बघून बाहेरचे दरोडेखोर भांबावून जातात, त्यांना आतमध्ये काय चाललय ते कळतच नाही. तेवढ्यात गौरव बसमधून बाहेर येतो, त्याला बघून सर्वजण थबकतात. कारण आजपर्यंत असे कधी घडले नव्हते. या दरोडेखोरांनी एखादी गाडी अडवली तर ती पूर्ण लुटूनच ते परत जात होते. आज मात्र काही वेगळेच घडत होते.
            गौरव बस समोर येऊन दरोडेखोरांच्या दोन्ही सरदारांच्या समोर येऊन उभा राहतो. त्यापैकी एकाचे नाव नागा असे आहे. हा नागा दिसायला अतिशय क्रूर, त्याच्या एका डोळ्यात टिक पडल्यामुळे तो पांढरा फटफटीत दिसत आहे, मोठे जाडे नाक, भरदार व लांब मिश्या, अंगाखांद्याने जाडजूड, थोडेशे पोट पुढे आलेले, त्यामुळे तो धष्टपुष्ट दिसत आहे. तर दुसर्‍याचे नाव ‘राणा’, त्याचे डोळे अगदी मोठे मोठे, पिळदार मिश्या, थोडेशी टक्कल पडलेले आहे, अंगाने पिळदार, दोघेही रुबाबदार घोड्यावर बसले आहेत. गौरवला बघून दोघेही कुत्सितपणे हसतात, राणा नागकडे बघून, “नागा, अरे हे तर कवळं पोरगं आहे रे, मला वाटलं १०-१२ जन असतील आपल्या पोरांना मारायला, पण हे तर एकटच दिसतय, का अजून कोणी हायं रे बसमधी... आसल तर भायेर या म्हणावं.” गौरवकडे बघून राणा, “आण काय रे मर्कटा, तुला तुझा जीव नकोसा झालाय व्हय रं, खुशाल आमच्या माणसांवर हात उचलतोस, ते पण एकटा, आणि ते पण ‘राणा आणि नागा’ जातीनं हजर असताना.” “एकतर तुला तुझा जीव नकोसा झाला आसल, नायतर तुला आमच्याबद्दल काही म्हायती नसल.” “चल एक येळा तुला माफ करतो, चल बाजूला हो आणि आम्हाला आमचं काम करू दे.” ए मूर्खांनो, मी अश्या फुकटच्या बाता करण्यात वेळ नाही घालवत, ज्याच्यात हिम्मत असेल ना त्याने पुढे येऊन बस मध्ये चढून दाखवा.” “कोणामध्ये हिम्मत आहे या पुढे...” हे ऐकून राणा व नागाचा संताप वाढतो, ते आपल्या साथीदारांना सांगतात, “जा रे कापून टाका याला, लय माज आलाय मूर्खाला..., कापून मुंडकं घेऊन या त्याचं इकडं, जो त्याचं मुंडकं कापून आणील त्याला आम्ही इनाम देऊ.... जा लवकर......” तसा एक काळा-काळा धिप्पाड दरोडेखोर गौरवला मारण्यास तलवार घेऊन धावत येतो. तो धावत गौरवच्या जवळ येतो व रागाने तलवारीचा वार गौरवच्या मानेवर करतो, पण त्याचा हात गौरवच्या मानेजवळ येऊन तसाच थांबतो व तो दरोडेखोर सुद्धा जाग्यावर खिळून उभा आहे एखाद्या पुतळयासारखा, नंतर नीट पाहिल्यावर लक्ष्यात येते की गौरवने त्या दरोडेखोराने तलवारीचा वार करण्याच्या आत त्याच्या गळ्यावर जोरात पंच मारलेला असतो, त्यामुळे तो जाग्यावर गतप्राण होतो व पाठीवर धाडकन आपटतो. हे पाहून बाकीचे दरोडेखोर थोडे दचकतात. त्याचवेळी बाहेर काय चाललय हे बघण्यासाठी विद्या आपल्या जाग्यावरुन उठून पुढे येत असते व ती ह्या दरोडेखोराला मारताना बघून स्तब्धच होऊन जाते. ती मनातून खूप आनंदीत होऊन जाते. पुढे काय होते ते बघण्यासाठी ती ड्रायवर शेजारी येऊन बसते. तिला बघून चंदू व टिनासुद्धा पुढे येतात. विद्याकडे बघून चंदू बोलतो, “बघितली आपल्या मित्राची कमाल, हे दरोडेखोर त्याच्यापुढे क्षुल्लक आहेत, पुढे बघ तो त्यांना कसे पाणी पाजतो ते.” विद्यासुद्धा खूप उत्साहित होऊन पुढे काय होईल ह्याची आतुरतेने वाट बघते. ड्रायवरच्या चेहर्‍यावर सुद्धा हसू उमटले आहे. कारण त्यानेसुद्धा गौरवची कमाल बघितली आहे.
            एका दरोडेखोराला मारल्यावर मात्र एकाचवेळेस चौघे दरोडेखोर गौरवला मारायला येतात. चौघांच्याही हातात तलवारी आहेत. दरोडेखोरांच्या हातात तलवारी बघून गौरव खाली मरून पडलेल्या दरोडेखोराची तलवार घेतो. ते चौघेही दरोडेखोर गौरवला चारी बाजूने घेरतात व त्याच्या भोवती गोल-गोल फिरायला लागतात. गौरव त्या सगळ्यांचे बारकाईने निरीक्षण करत आहे. कधी तो एकेकाच्या डोळ्यात बघतो, तर कधी हाताच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवतो, तर कधी त्यांच्या पायांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो, व हे करत असताना तो मनात काहीतरी विचार करत असतो. ते चौघेही दरोडेखोर गौरववर कसा वार करायचा याचा विचार करत असतात, तेवढ्यात एक समोरचा दरोडेखोर गौरववर समोरून वार करतो, तो वार गौरव तलवार आडवी करून झेलतो, व तलवारीनेच त्याला ढकलतो. त्यापाठोपाठ मागचा दरोडेखोर मागून वार करतो, पण प्रसंगावधान राखून गौरव लगेच मागे फिरून त्याचाही वार तलवारीने अडवतो. तसे सर्व दरोडेखोर एकापाठोपाठ एक गौरववर वार करत जातात व गौरव त्यांचे वार झेलत जातो, ते कधी वरून वार करतात तर कधी पायावर वार करतात, कधी कंबरेच्या दिशेने वार करतात तर कधी छातीत तलवार खुपसण्याचा प्रयत्न करतात, गौरवही त्यांचे वार तसेच व तेवढ्याच चपळाईने झेलतो, तर कधी चुकवतो, खालून वार केला तर गौरव जोरात उंच उडी मारतो, कंबरेवर वार केला तर गौरव थोडा बाजूला होऊन तो वार झिडकावून लावतो, छातीत तलवार खुपसण्याचा प्रयत्न केला तर तो एकदम बाजूला होऊन तो वार चुकवतो, ही झटपट चालू असताना ते कधी मागे जातात तर कधी पुढे तर कधी उजवीकडे तर कधी डावीकडे, असे सारखे इकडून तिकडे सरकत असतात. एवढा वेळ त्यांची झटपट चालू आहे पण गौरवने त्यांचा फक्त वार चुकवण्याचा, त्यांचा वार झेलण्याचा किंवा अडवण्याचा प्रयत्न केला आहे, अजूनपर्यंत त्याने एकदाही दरोडेखोरांवर पलटुन वार केलेला नाही. पण हे आत्तापर्यंत कोणाच्याही लक्ष्यात आलेले नाही. बराचवेळ त्यांची लढाई चालू आहे, आता मात्र दरोडेखोरांना थोडेसे थकल्यासारखे जाणवत आहे. सगळेजण थोडे शांत उभे राहतात, दरोडेखोर थोड्या थोड्या धापा टाकत आहेत व जोरजोराने श्वास घेत आहेत, गौरव मात्र मिश्किलपणे हसत त्यांच्याकडे बघत उभा आहे.
            हे सर्व बघून विद्या उत्सुकतेने चंदूला विचारते हा गौरव दरोडेखोरांना पलटवार का बरं करत नाही, तो नुसता त्यांचे वार झेलून का बरं घेतो, का त्याला तलवार चालवता येत नाही. तसा चंदू बोलतो, अगं ही त्याची खेळी आहे, तो खेळवतोय त्या दरोडेखोरांना, हे त्यांच्या लक्ष्यातच येत नाहीये, पुढे बघ तो एकेकाला कसा कापून टाकतो ते. पुन्हा ते दरोडेखोर थोडी विश्रांति घेतल्यानंतर लढण्यासाठी तयार होतात, त्यांच्यामधील एकजण गौरवच्या पोटात तलवार खुपसण्यासाठी धावून येतो, तसा गौरव प्रसंगावधान राखून थोडासा बाजूला सरकतो व उलट्या दिशेने गोल फिरून दरोडेखोरच्या डाव्या हातावर तलवारीने वार करतो, त्यामुळे दरोडेखोरचा डावा हात जखमी होतो, तो दरोडेखोर थोडासा विव्हळतो व पुन्हा चवताळून गौरववर वार करायला जातो पण गौरव चपळाईने दरोडेखोराच्या तलवार धरलेल्या हाताच्या मनगटाजवळ वार करतो. हा वार इतका जोरात असतो की दरोडेखोरचा हात मनगटापासून तुटून तलवारीसहित लांब जाऊन पडतो. हे बघताच बसमधून बघत असलेला चंदू तोंड उघडून अचंबित होऊन बघत राहतो, विद्या व टिना आपापल्या तोंडावर हात ठेऊन डोळे विस्फारून बघत राहतात, ड्रायवर स्वतःची मांडी थोपटतो व मिशांना ताव देतो. हात तुटल्यामुळे दरोडेखोर खुप जोरजोराने ओरडायला लागतो, जखमी हात धरून इकडून तिकडे झोकांडात राहतो. त्याच्या सोबत असलेले दरोडेखोरही थोडेशे घाबरतात. गौरव पुन्हा त्या जखमी दरोडेखोराच्या पायावर वार करतो व त्याचा पाय घुडघ्यापासून कापून टाकतो. पाय गुढघ्यापासून कापल्यामुळे तो दरोडेखोर खुप जोरात ओरडतो व कोलमडत बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो. हे बघितल्यावर बाकीचे तिघे दरोडेखोर एकमेकांकडे बघायला लागतात. व आता गौरवला मारायला कोण जाणार ह्याचा विचार करतात. तसा गौरव आपला पवित्र त्या तिघा दरोडेखोरांकडे वळवतो. 
             त्या तिघा दरोडेखोरांपैकी एक धिप्पाड दरोडेखोर गौरवला मारायला पुढे सरसवतो. तो दरोडेखोर गौरववर तलवारीने जोरात वार करतो. गौरव तो वार झेलण्यासाठी आपली तलवार आडवी धरतो, पण दरोडेखोराचा वार एवढा जोरात असतो की, गौरव दरोडेखोराच्या वाराने व त्याच्या भाराने खुप वाकून जातो. दरोडेखोर गौरववर अजून भार देतो, तसा गौरव मागे मागे सरकत जातो व थोडासा काना फिरून दरोडेखोराला बाजूला ढकलून देतो. दरोडेखोर पुन्हा मागे फिरून गौरवकडे खुनशी नजरेने बघतो व पुन्हा गौरववर वार करायला धावून येतो. तो दरोडेखोर खुप चवताळून गौरववर एकामागून एक वार आडवे-तिडवे करत जातो व गौरव त्याचे वार झेलून त्याला प्रतिउत्तर देत राहतो. दरोडेखोर वार करत करत गौरवच्या खुप जवळ येतो व गौरवला खुप जोरात धक्का देतो तसा गौरव मागे झोकांडात खाली पाठीवर पडतो. दरोडेखोर थोड्याश्या तोर्‍याने गौरवकडे बघत हसतो. गौरवला आता मात्र थोडासा राग येतो. तो चपळाईने उडी मारून उभा राहतो. दोघे एकमेकांकडे बघतात व पुन्हा लढायला तयार होतात. गौरव एक पाय मागे घेऊन पुढच्या पायावर झुकतो व डावा हात तोंडासमोर आडवा धरून उजव्या हाताने त्याच्या तलवार धरून लढण्यासाठी पवित्रा घेतो, व दरोडेखोराला लढण्यासाठी खुनवतो. हा पवित्रा बघून दरोडेखोर थोडासा अचंबित होतो व गौरव काही कच्च्या गुरूचा चेला नाही हे तो ओळखतो. 

If you want to read this story in English click here 

                दरोडेखोर गौरवला मारायला धावून येतो, जवळ येऊन तलवारीचा आडवा वार करतो, पण गौरव आपल्या तलवारीने तेवढ्याच वेगाने वार झेलून त्याला प्रतिउत्तर देतो. आता गौरव दरोडेखोरावर तलवारीचा जोरात वार करतो. दरोडेखोरही त्याचा वार तलवारीने झेलतो, पण गौरवचा वार खुप जोरात असल्याने दरोडेखोराच्या हाताला झटका बसतो. पुन्हा गौरव जोराने व जलद गतीने दरोडेखोरावर आडवे-तिडवे, खालून पायावर, वरून असे एकामागून एक वार करू लागतो, हे वार दरोडेखोर आपल्या तलवारीने झेलतो पण गौरवचे वार एवढे प्रभावी असतात की ते वार झेलताना व चुकवताना दरोडेखोराच्या नाकी नऊ येतात. दरोडेखोराची पार दमछाक होऊन जाते. आता मात्र गौरवच्या प्रत्येक वाराने दरोडेखोर मागे मागे सरकत जातो. गौरव मात्र वार करतच राहतो. दरोडेखोर गौरवचा वार चुकवून थोडासा मागे पळून जातो व गौरवपासून लांब जाऊन उभा राहतो व गौरवकडे बघत उभा राहतो, व लक्षं ठेऊन राहतो की गौरव पुन्हा वार तर नाही न करणार. दरोडेखोर खुप दमल्याने खुप जोरजोराने धापा टाकत असतो. गौरव मात्र मिष्किलपणे हसत दरोडेखोराकडे बघत उभा राहतो. दरोडेखोराला मात्र आता पुढे काय करावे सुचत नाही. मागे पळून जावे तर सरदार मारून टाकील आणि इथे थांबावे तर गौरव मारून टाकील. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी दरोडेखोराची परिस्थिती झाली आहे. तेवढ्यात गौरव तलवारीनेच दरोडेखोराला लढायला यायला खुणावतो, मात्र दरोडेखोर मानेने नाही यायचे असा इशारा करतो. गौरव इशार्‍याने त्याला सांगतो तू इकडे येतो की मी तिकडे येऊ, तेव्हा घाबरून दरोडेखोर गौरवला तू तिथेच थांब मीच तिकडे येतो असा इशारा करतो. आता मात्र आपणच गौरववर जोराने वार करायचे व त्याचा मुडदाच पाडायचा असा विचार दरोडेखोर करतो व गौरवला मारायला जोरात धावून येतो, तलवार समोर धरून गौरवच्या पोटात खुपसण्यासाठी दरोडेखोर धावत येतो परंतु गौरव प्रसंगावधान राखून थोडासा काना होऊन दरोडेखोराचा वार चुकवतो व दरोडेखोर सरळ पुढे निघून जातो, पुढे जाऊन आपला वार चुकला म्हणून दरोडेखोर थांबतो व मागे फिरून गौरवकडे पाहतो व चवताळून पुन्हा गौरववर वार करण्याची तयारी करतो, पण त्याच्या कंबरेजवळ वेदना झाल्यासारखे त्याला जाणवते, तो चाचपडून बघतो तर त्याचा हात ओला होतो, खाली वाकून बघतो तर कंबरेवर डाव्या कुशीत तलवारीचा वार झाल्यामुळे जखम झालेली असते व त्याच्यामधून रक्त बाहेर येत आहे हे त्याला कळते. जखम बघून त्याला अजून वेदना होतात व तो रडकुंड्या चेहर्‍याने गौरवकडे बघतो. गौरवने आपल्यावर कधी वार केला असा तो विचार करू लागतो, (जेव्हा दरोडेखोर गौरवच्या जवळ येतो तेव्हा गौरव थोडासा तिरपा होतो व त्याचक्षणी गौरव आपली तलवार दरोडेखोराच्या कंबरेजवळ आडवी धरून हळूच पुढे ओढतो, पण दरोडेखोराचा वेग जास्त असल्यामुळे हा वार त्याच्या लक्षातच येत नाही) हे आठवल्यावर दरोडेखोराची तारांबळ उडून जाते. दरोडेखोर पुन्हा गौरववर वार करायला चालत येतो पण गौरव पुढे जाऊन दरोडेखोरवर वार करतो, दरोडेखोर आपल्या तलवारीने त्याचा वार झेलतो, गौरव पुन्हा जोरजोराने वार करायला लागतो, दरोडेखोर मात्र फक्त तलवार आडवी धरून त्याचे वार झेलत जातो व मागे मागे सरकत जातो, शेवटी दरोडेखोराच्या हाताला मरगळ येऊन त्याच्या हातातून तलवार गळून खाली पडते व दरोडेखोर खुप घाबरून गौरवकडे बघत उभा राहतो पण गौरव क्षणाचाही विलंब न करता एका वारात दरोडेखोराचे शिर धडावेगळे करून टाकतो, दरोडेखोराचे शिर लांब जावून पडते व बाकीचे धड जागेवरच कोसळते.
                                    [.....उर्वरित पुढील भागात.....]
 
जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर Like, Subscribe आणि follow जरूर करा. व इतरांनाही Share करा.

Sunday, 6 June 2021

बदला (भाग १)

  

बदला

भाग १

        दुपारची वेळ आहे, आकाशात सूर्यदेव जणूकाही खूप संतापल्यामुळे आग ओकत आहे, त्यामुळे पृथ्वी आपले संतुलन बिघडल्यामुळे उष्णतेने जणू काही आगीच्या ज्वाळा आपल्या उदरातून बाहेर फेकत आहे. अश्या भर दुपारच्या वेळेस लांब वळणावळणाच्या रस्त्याने एक बस डोंगराच्या दिशेने भरधाव वेगाने चालली आहे. ही बस ज्या रस्त्याने चालली आहे तो रस्ता पुढे जाऊन खूप घनदाट जंगलातून जाणारा आहे, ह्या जंगलातील रस्ता खुप वळणावळणाचा आहे, व खुप खोल खोल दर्‍या आहेत. ह्या जंगलात खुप वेळा दरोडेखोर येणार्‍या जाणार्‍या गाड्या आडवुन त्यांची लूट करतात, व कधी कधी गाडीतील प्रवाश्यांना मारून खोल दरीत फेकून देतात, ह्या दर्‍या इतक्या खोल आहेत की त्या दरीत पडल्यानंतर कोणीही परत जिवंत येत नाही. व गाडीचा शोधही लागत नाही, व कोणी भीतीमुळे दरीत शोध घेण्यासाठी गेलेसुद्धा नाही. ह्या जंगलात व ह्या दर्‍यांमध्ये खुप वेगवेगळ्या प्रकारचे जंगली प्राणी आहेत. वाघ, सिंह, अस्वल, हत्ती, वानर, कोल्हे, माकडे, लांडगे, तरस असे वेगवेगळे हिंस्र प्राणी ह्या जंगलात आहेत, व त्याही पेक्षा जास्त भयंकर दरोडेखोर. त्यामुळे कोणीही कोणाचाही शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही.

If you want to read this story in English click here 

ये कहाणी हिन्दीमे पढणे के लिये यहा क्लिक करे

        आपण आता आपल्या बस कडे वळूया. कारण आपली गोष्ट खरी ह्या बस मधूनच सुरू होत आहे. चला तर बस मध्ये काय चाललय ते बघूया. ह्या बस मधील काही प्रवाशी उन्हामुळे खुप गरम झाल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत, तर खिडपाशी बसलेले प्रवाशी एखाद्या झाडाखालून बस गेल्यावर थंड वार्‍याची झुळूक आल्यावर आनंदीत होतात. कंडक्टरच्या सीटवर बसलेला कंडक्टर त्याचा हिशोब करत आहे. (वय साधारण चाळीशीच्या आसपास)
        मागच्या सिटवर बसलेले वृद्ध आजोबा (वय साधारण 70 ते 75 वर्षे) ड्रायवरला ओरडून बोलतात, “ओ ड्रायवर भाऊ, जरा बस हळू चालवा की, मागे बसल्यामुळे बस आदळून आदळून आमच्या हाडांचे खुळखुळे झाले राव.” ड्रायवर (वय साधारण 40 ते 45 वर्षे) आपल्याचा तोरात उत्तर देतात, “काका, आपल्याला मुक्काम नाही करायचा आहे इथे, पुढे घनदाट जंगल व घाटाघाटांचा रस्ता आहे, अंधार पडायच्या आत जंगल व घाट पार करून गेले पाहिजे.” त्या वृद्ध आजोबांच्या शेजारी बसलेली त्यांची चिमुरडी नात ‘परी’ (तिचे नाव) (वय साधारण 7 ते 8 वर्षे) उत्सुकतेने तिच्या आजोबांना विचारते, “आजोबा, आपण का बरं त्या जंगलातून अंधार पडायच्या आत निघून गेले पाहिजे, असे काय आहे त्या जंगलात की आपण अंधार पडेपर्यंत त्या जंगलात नाही राहू शकत, जंगल तर खुप सुंदर असतय ना, ज्यामध्ये खुप मोठमोठी झाडे, उंच उंच पर्वत रांगा, त्यामधून छोटे छोटे झरे वाहत असतात, असे मी पुस्तकात वाचले आहे, व टीव्ही मध्ये पण बघितले आहे.” त्यांच्या पुढच्या सीटवर बसलेल्या जोशी काकू तिला समजावत बोलतात, “अगं बाळा, ते टीव्हीतले जंगल बघायला छान वाटते, पण ह्या जंगलात खूप भयानक दरोडेखोर आहेत, खुप दलिंद्री आहेत मेले, नुसत्या गाड्या लुटतात.” मधल्या सीटवर बसलेली ‘विद्या’ (वय साधारण 20 ते 21 वर्षे) उतावळी होऊन, “अय्या खरच”.

If you want to read this story in English click here 

ये कहाणी हिन्दीमे पढणे के लिये यहा क्लिक करे
        ही विद्या म्हणजे जणू काही अप्सराच, अतिशय सुंदर, गोरी पान, लांब काळेभोर केस मस्त पाठीवर मोकळे सोडलेले, खिडकीशेजारी बसल्यामुळे काही बटा छान तिच्या गालावर हळुवार रूळताना तिचे ते स्मित हास्य, अगदी मनाला भिडून जाते, त्या गालावरच्या बटा ती तिच्या नाजुक कोमल हातांनी बाजूला सरताना थोडीशी तिरप्या नजरेने बघते तेव्हा जणू काही नजरेचे तीर छातीत घुसल्यासारखे जाणवते. तिचे गुलाबी ओठ, हसताना गालावरची खळी, सडपातळ बांधा, अगदी मनात भरावे असे सौंदर्य. कुणीही अगदी पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडावे अशी ती सुंदर तरुणी अचानक बोलल्यावर बसमधले सगळे तिच्याकडे बघायला लागले. “मला बघायचे आहेत दरोडेखोर”, ती पुढे बोलली. “ते काही सर्कशीतले प्राणी नाहीयेत, म्हणे मला बघायचेय” मिसेस शर्मा (वय साधारण 35 ते 36 वर्षे) थोड्या तुसडया आवाजाने तोंड वाकडे करत बोलल्या. तसा ‘चंदू’ (वय साधारण 29 ते 30 वर्षे) विद्याच्या पलीकडच्या सीटवर बसलेला असतो, तो आपली हिरोगिरी दाखवत उठून फुशारकिने बोलला, “ह्या बस मध्ये मर्द पण आहेत, (विद्याच्या शेजारी बसलेल्या टिनाकडे हलक्या नजरेने बघत) माझ्यासारखा शुर वीर ह्या बसमध्ये असताना कशाला कोणी घाबरायचे?.” हे ऐकून थोडेशे मागे बसलेले ‘गोडबोले’ (वय साधारण 40 ते 45 वर्षे) (थोडेशे टकले पडलेले) बोलले, “ओ मिस्टर, तुम्ही पहिली तुमची चड्डी संभाळा, कुठेही आपली शायनिंग मारायला निघतात, (सर्वजण जोरजोरात हसू लागतात) त्याला माझ्यासारखा निधड्या छातीचा वीर पुरुष पाहिजे, जो संकटात तुमचे प्राण वाचवेल.” तेवढ्यात चंदू बोलतो “ओ काका, तुमचे केस उडाले बघा खिडकीतून” हे ऐकून गोडबोले आपल्या गडबडून खिडकीतून बाहेर बघत आपल्या डोक्यावरील केसं चाचपडतात, तसे सर्वजण पुन्हा हसू लागतात. गोडबोले मात्र कांढावून जातात. बसमध्ये असा सर्व हसी मजाक चालू आहे, पण चंदू शेजारी बसलेला ‘गौरव’ जो आपल्या कहाणीचा खरा नायक आहे, त्याचे मात्र ह्या सर्व गोष्टींकडे लक्षच नाहीये, तो शांत नजरेने खिडकीतून बाहेर बघत आहे, जणूकाही बसमध्ये काय चाललय हे त्याला माहितीच नाही, किंवा तो बसमध्येच नाहीये अश्या पद्धतीने तो बसला आहे, तो आपल्याच कुठल्या तरी विचारात गढून गेला आहे.

If you want to read this story in English click here 

ये कहाणी हिन्दीमे पढणे के लिये यहा क्लिक करे
        ‘गौरव” (वय साधारण 24 ते 25 वर्षे) हा तरुण तडफदार, दिसून देखणा, अंगाने पिळदार शरीर, भरदार छाती, पिळदार दंड, ओठांवर थोड्याश्या मिसरूड फुटलेल्या, बघताच कोणतीही तरुणी त्याच्या प्रेमात पडावी अशी शरीरयष्टी, त्याला बघून विद्या त्याच्या जणूकाही प्रेमातच पडली असे तिला वाटते, ती जरा हसून चंदूला बोलते “ए चंदू, तुझ्या शेजारी कोण आहे, ज्यांचं आपल्याकडे लक्षच नाहीये, त्यांना ऐकायला येत नाहीये का, की बोलता येत नाहीये,” चंदू बोलतो, “ओ मॅडम, तो आपला जिगरी दोस्त आहे, त्याला काही बोलायचे नाही हा, त्याला बोलले तर आपली लगेच सटकते.” “अपना भाय एक ही बार आता है, लेकीन हवा करके जाता है, क्या...” “तू उसकी छोड, अपने सहेली को बोल ना आपुनसे बात करने के लिये.” हे सगळे चालू असताना बस कधी जंगलात गेली ते कळालेच नाही.
        भर जंगलातून, घाटाघाटातून बस वेगवेगळ्या वळणातून वळण घेत, एक एक दरी ओलांडत बस जंगलाच्या मध्यभागी कधी आली ती कळालीच नाही. अचानक ड्रायवर बस थांबवतो. बसमधील काहीजण ओरडतात, “ओ ड्रायवर, बस का बरं थांबवली, अशी जंगलामध्ये.” “पुढे रस्त्यात दगडे लावलेली आहेत.” ड्रायवर बोलला. “काय???” सर्वांच्या तोंडून घाबरून व आश्चर्यचकित होऊन निघालेला एकच स्वर. एक प्रवाशी “आत्ता काय करायचे?” त्यावर जोशी काकू बोलल्या “जर दरोडेखोर आले तर.....?” “हे असे रोडवर दगड त्यांनीच तर लावले नसतील ना?” थोडीशी घाबरत विद्याच्या शेजारी बसलेली तिची मैत्रीण ‘टिना’ बोलली. टिना पण सुंदर तरुणी आहे, पण विद्यापेक्षा थोडीशी कमी सुंदर आहे, साधारणपणे विद्याच्याच वयाची. तसा चंदू बोलला, “अरे डार्लिंग, टेंशन कशाला घेतेस, मी आहे ना, मी असताना काय हिम्मत त्या दरोडेखोरांची इथे यायची, ते जर इथे आले तर, एक-एकाला असे ठेचून ठेचून मारेल.” तेवढ्यात वरून डोंगरातून व खालून दरीतून काही दरोडेखोर बसकडे धावत येताना दिसतात, ते काही क्षणात बसला वेढा घालतात, त्यांच्या हातात बंदुका, तलवारी, चाकू असे हत्यारे आहेत, दिसायला अगदी क्रूर. त्यांना बघताच चंदू घाबरून सिटखाली जाऊन लपून बसतो, सर्वजण खुप घाबरून जातात. जो तो आपला जीव कसा वाचेल असा विचार करत असतो, गौरवचे मात्र ह्या सर्व गोष्टींकडे लक्षच नाहीये. तो सुन्न नजरेने बसमधून बाहेर बघत आहे, बस कधी थांबली व दरोडेखोर कधी आले हे त्याला कळलेच नाही. बसला घेरल्यानंतर काही दरोडेखोर बस न्याहाळून व आजूबाजूला बघून काही धोका नाही याची खात्री करतात. खात्री केल्यानंतर एक सडपातळ तरुण दरोडेखोर जंगलाकडे बघून जोरात शिट्टी मारतो, तसे जंगलातून दोन दरोडेखोर घोड्यावर बसून बसकडे येतात. दिसायला अगदी क्रूर, हातात बंदुका, गळ्यात बंदुकांच्या काडतूसांचा बेल्ट तिरपा अडकवलेला. कपाळावर काळा टिका लावलेला, डोळे लाल आगीच्या निखार्‍यासारखे, एकाच्या एका डोळ्यात टिक पडल्यामुळे तो पांढरा फटफटीत दिसत आहे, दुसर्‍याचे डोळे अगदी मोठे मोठे, पिळदार मिश्या, एकाचे थोडेशी टक्कल पडलेले आहे. अंगाने दोघेही पिळदार, ते त्यांच्या साथीदारांकडे बघून बोलतात “जा रे आतमध्ये, काय असेल नसेल ते घेऊन या त्यांच्याकडून, गप गुमान नाही दिले तर तिथेच कापून टाका त्याला, कोणी शहाणपणा केला तर मुसक्या आवळून बाहेर आणा त्याला.” तसे काहीजण बसमध्ये चढतात, एकजण ड्रायवरच्या डोक्याला बंदूक लावतो, एकजण जोरात बोलतो, “तुम्हाला तुमचा जीव प्यारा असल तर गपचूप तुमच्याकडे काय असेल ते काढून द्या, जर शहाणपणा केला तर, इथेच मुडदा पाडील त्याचा.” “व्हारं पुढं, घ्या पटापट त्यांच्याकड काय हाय ते”, तसा एकजण कंडक्टर जवळ जाऊन “अय कंडक्टर, द्या इकड किती खजिना गोळा केला आहे तो, आणा लवकर चला” तसा कंडक्टर घाबरून पैश्यांची बॅग काढून त्यामधील नोटा त्याच्याकडे देतो, तसा तो दरोडेखोर कंडक्टरवर खेकसून बोलतो, “अन ती चिल्लर कोण देईल? तुझा बाप?” तसा लटपटत कंडक्टर चिल्लर त्याच्या त्याच्या ओंजळीत ओततो. दूसरा एक थोडासा चकणा दरोडेखोर दुसर्‍या शिटवरील काकूंना थोड्याश्या गमतीने तिच्या कानाजवळ बंदूक धरून बोलतो “ओ काकू, तुम्ही मला तुमचा खजिना देताय का, मी देऊ तुम्हाला.... गोळी.... हं...हं..... हं...हं..... हं.” आणि जोरजोरात हसतो, त्या काकू घाबरत आणि थोड्याश्या नाक तोंड मुरडत तिच्या पर्स मधील पैसे त्या दरोडेखोराकडे देते, तसा तो दरोडेखोर त्या बाईवर ओरडून बोलतो, “ह्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, आणि तो गळ्यातला सोन्याचा हार काय गळा कापून घेऊ काय?” “ए पक्या, चाकू आण रे, ह्या काकूंच्या गळ्यातला हार निघत नाहीये” तश्या त्या काकू पटकन बांगड्या आणि गळ्यातला हार काढून त्या दरोडेखोरच्या हातात देतात, तसा तो दरोडेखोर त्यांच्या शेजारच्या जाड्या गृहस्थांना, “ए मोटे, तुझे क्या गोली पार्सल भेजु क्या?” “चल निकाल माल जल्दि” ते गृहस्थ पटकन त्यांच्याजवळील पैसे काढून त्या दरोडेखोरकडे देतात, तो दरोडेखोर, “आणि ती गळ्यातली चैन?, तुमचा पण गळा कापून घेऊ काय?” “ए पक्या आण रे चाकू, च्या मायला सरळ भाषेत समजतच नाही यांना.” तसे ते गृहस्थ, “ओ नाही ओ, ही चैन माझ्या बायकोने भेट दिली आहे मला वाढदिवसाला...” “मग मी त्यांना तुमचा मुंडक पाठवतो, भेट म्हणून.....” तो दरोडेखोर थोडासा हसून बोलला, तशी त्या गृहस्थांनी ती गळ्यातील चैन गुपचुप काढून त्या दरोडेखोरला दिली.
        मागच्या शिटवर बसलेली चिमुरडी 'परी' आपल्या आजोबांना विचारते, “आजोबा, हे कोण आहेत?, आणि हे असे का पैसे मागतात?”, त्यावर आजोबा उत्तरले, “बाळा हेच ते ह्या जंगलातले दरोडेखोर” परीने पुन्हा प्रश्न केला, “मग ह्यांना कोणीच अडवत नाही का?” “ज्यांनी ह्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना ह्या नराधमांनी मारून टाकले.” आजोबांनी थोडेशे घाबरतच सांगितले. “मग आपल्याला आता कोणीच वाचवणार नाही का?” परीने पुन्हा प्रश्न केला. तसे आजोबा वर बघतात व काहीसे पुटपुटतात “देवाची मर्जी, त्याच्या मनात असेल तर आपल्याला वाचवेल, नाहीतर.....” आणि आजोबा शांत झाले व परीच्या तोंडावर हात ठेवला व तिला शांत बसायला सांगितले. हे बोलणं काहीसे जो चकणा दरोडेखोर आहे ‘मन्या” त्याचे नाव, त्याने ऐकले तसा तो बोलला, “ए पक्या, मागे काहीतरी गुटर्गू चालू आहे बघ रे, माज आलाय साल्याना, जा मागे पण वसुली कर जा लवकर.” तसे काही दरोडेखोर मागे जातात व काही थोडेसे पुढच्या शिटकडे सरकतात. रम्या टिना जवळ जाऊन बोलतो, “मॅडम क्या लाई हो हमारे लिये, जरा जल्दि दो, हमे और न तरसाओ” टिना खुप घाबरून जाते व पटापट पर्समधून पैसे काढायला लागते, तशी शेजारी बसलेली विद्या काहीशी पुटपुटते, “स्टुपिड...” तसा रम्या बोलतो “ओ इंग्लिश मॅडम, गुपचुप जवळ जे काय आसल ना ते काढून द्या, नाहीतर आमच्याकडची इंग्लिश गोळी इकडच्या कानात घुसून तिकडच्या कानातून इंग्लिश गाणं म्हणत बाहेर पडल” थोडा हसून, विद्या थोडीशी रागानेच बघते व काही पर्याय नसल्यामुळे मांडीवरील बॅगमध्ये पैसे शोधायला लागते. मागे गेलेला गण्या थोडासा रागाने बोलतो, “इकडे कोणाची मचमच चालू आहे रे...” इकडे चंदूच्या शिटाजवळ जाऊन एक दरोडेखोर चंदूला खाली लपलेला बघून, “इकडे काय भुयार शोधण्याचे काम चालू आहे काय?” व चंदूला मानेला धरून वर ओढतो. तसा चंदू खुप घाबरून जातो व त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नाही, तसा दरोडेखोर, “भुयार खणून झाले असेल तर जो खजाना सापडला असेल तो देता का आमच्याकडे महाशय” तसा चंदू त्याचे पाठीमागच्या खिशात असलेले पाकीट काढतो व त्यामधील पैसे काढून त्या दरोडेखोरच्या हातात थरथरत्या हातांनी देतो. चंदूला मागे शिटकडे ढकलून तो दरोडेखोर गौरवकडे वळतो व त्याला म्हणतो, “ए हीरो, चल पैसे काढ लवकर” गौरवचे त्याच्याकडे लक्षच नाहीये, तो नुसता खिडकीच्या बाहेर बघत आहे, गौरव आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही हे लक्षात येताच, तो दरोडेखोर रागाने पुढे होऊन गौरवची कॉलर पकडतो व त्याला बोलतो, “माज आलाय का जास्त, मी काय बोलतोय ते काळात नाही, का ऐकायला येत नाही?” गौरवला त्याची कॉलर कोणीतरी पकडली आहे हे लक्ष्यात येताच तो रागाने मागे वळून बघतो, रागाने त्याचे डोळे लालबुंद झाले आहेत, गौरवची नजर आणि दरोडेखोराची नजर एक होताच दरोडेखोर थोडासा दचकतो, व पुन्हा स्वतःला सावरून थोडासा हसत आपल्या साथीदारांना बोलतो, “ए मन्या हा बघ, रागाने बघतो, च्या मायला आपण घाबरलो राव!,” व घाबरण्याची एक्टिंग करतो, तसे सर्वजण हसू लागतात. तो दरोडेखोर पुन्हा गौरवची कॉलर पकडून गौरवला बोलतो, “ए लय झालं तुझ नाटक, चल पैसे काढ चल.” “कॉलर सोड” गौरव त्या दरोडेखोराला रागाने बोलतो, तसा तो दरोडेखोर पुन्हा गमतीने इतरांना बोलतो, “ए हा बोलतो पण, आणि ते पण रागाने.” सर्व दरोडेखोर पुन्हा हसू लागतात. चंदू काहीश्या हलक्या आवाजात बोलतो, “आता हा गेला”, ते ऐकून दरोडेखोर थोड्याश्या रागाने “ए हा पण बोलला” दरोडेखोर आणखी रागाने गौरवची कॉलर पकडून त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत बोलतो, “हे सगळे ह्याच्यामुळे होतय, ए चल बाहेर ये चल” असे बोलून गौरवला ओढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे बोलणे पुर्ण होताच गौरव त्या दरोडेखोराला काही कळण्याच्या आत त्याला एका हिसक्यात खिडकीची काच फोडून त्याला खिडकीच्या बाहेर फेकून देतो, हे सगळे एवढ्या जलद गतीने होते की कोणाच्याच काही लक्ष्यात येत नाही की नेमके काय झाले, सगळ्यांना फक्त खिडकीची काच फुटल्याचा आवाज आला व बाहेर काहीतरी पडल्याचा धपकन आवाज आला, त्यामागुन त्या दरोडेखोराचा किंचित कन्हत “आई... गं.....” असा अस्पष्ट आवाज आला, हे घडल्यावर बसमधले व बसच्या बाहेरचे दरोडेखोर थोडेशे दचकले व बसमधील मागचे प्रवाशी आश्चर्याने पुढे व गौरवच्या पुढचे प्रवाशी मागे बघू लागले. अजूनपर्यंत त्यांना हे कोणी केले हे कळलेच नव्हते. पुढचा दरवाज्यातील दरोडेखोर मागच्या दरोडेखोराकडे बघत नजरेने त्याला कोण आहे ते बघायला सांगतो. तसा तो दरोडेखोर घाबरत घाबरत हळू हळू दबक्या पावलांनी पुढे येऊ लागतो. तेवढ्यात गौरव उठून उभा राहतो. पिळदार शरीरयष्टी, भरदार छातीचा गौरव उभा राहताच त्याला बघून बसमधील प्रवाश्यांना थोडासा दिलासा मिळतो, विद्या मात्र स्वतःचे भान हरपून गौरवकडे बघत असते. याउलट बसमधील दरोडेखोर मात्र काहीसे घाबरले आहेत. गौरव उभा राहताच पुढे येणारा पुढे येणारा दरोडेखोर जागीच थबकतो. चंदू मात्र जोरात एक शिट्टी मारतो, तसे बसमधील प्रवाश्यांच्या चेहर्‍यावर अजून हसू उमटते. गौरव शिटमधून बाहेर येतो, विद्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करणारा रम्या गौरवकडे बंदूक रोखण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही करण्याच्या आत गौरव त्याच्या गुढघ्यावर जोरात किक मारतो, त्यामुळे रम्याचा पाय मध्येच मोडतो, व तो जोरजोरात ओरडायला लागतो. गौरव रम्याच्या डोक्याला वरून एका हाताने पकडतो व दुसर्‍या हाताने त्याची हनुवटीला धरून त्याची मान कटकण मोडतो, तसा तो गतप्राण होऊन जागेवर पडतो. हे बघून त्याच्या पुढे असलेला मन्या चाकू घेऊन धावतो, व गौरवला चाकू मारण्याचा प्रयत्न करतो पण गौरव खाली बसतो व मन्याच्या पोटात जोरात पंच मारतो, तसा मन्या अर्ध मेला होतो, गौरव मन्याचा चाकू असलेला हात पकडतो व त्याच्या त्या हाताच्या खांद्याजवळ पुन्हा पंच मरतो, त्यामुळे त्याचा चाकू आपोआप गळून पडतो. तो चाकू हातात घेऊन गौरव उभा राहतो व मन्याच्या पोटात जोरात किक मरतो तसा मन्या जोरात मागे जाऊन ड्रायवरच्या पुढची काच फोडून बाहेर पडतो. तेवढ्यात मागून येणारा दरोडेखोर गौरव वर बंदूक रोखून गोळी मारण्याचा प्रयत्न करतो, तसा गौरव काही क्षणात मागे फिरून हातातील चाकू त्या दरोडेखोराला फेकून मरतो, तो चाकू दरोडेखोरच्या उजव्या छातीच्या वर खांद्याजवळ खुपसतो, तशी दरोडेखोराच्या हातातील बंदूक खाली गळून पडते व तो खाली पडतो. कंडक्टर जवळ असलेला दरोडेखोर धावत गौरवला मारायला येतो परंतु गौरव उजवा हाताचा कोपर जोरात मागे घेऊन मागच्या दरोडेखोराच्या छातीत जोरात कोपरखिळी मरतो. तसा तो जाग्यावरच खिळून जातो व तो थोडासा पुढे वाकतो व त्याच्यामुळे त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येते. आणि लगेच वेळ न दवडता गौरव त्या दरोडेखोराला एका हाताने गच्चीला व एका हाताने कंबरेचा बेल्ट धरून त्याला फिरवून पुढे पाठीवर आपटतो. तो दरोडेखोर जाग्यावर गतप्राण होऊन पडतो. तसा गौरव जलदगतीने दरवाज्यात उभ्या असलेल्या दरोडेखोराजवळ जातो व त्याला काही कळण्याच्या आत त्याच्या पोटात जोरात लाथ मरतो. तसा तो दरोडेखोर दरवाजा सहित लांब बाहेर जाऊन पडतो. एवढे झाल्यावर गौरव मागच्या शिटकडे उभ्या असलेल्या दरोडेखोराकडे बघतो तो तिकडे जाऊ लागतो. तसा तो दरोडेखोर घाबरून परीच्या डोक्याला बंदूक लाऊन बोलतो, “ए पुढे येऊ नको, पुढे आलास तर मी हिला गोळी घालील” हे बघून परीचे आजोबा पण घाबरून जातात, व त्या दरोडेखोराला विनवण्या करतात, व बोलतात, “माझ्या बाळाला सोडा, माझी चिमूरडी नात, तिने काय केलय तुम्हाला?” “ए थेरड्या” तो दरोडेखोर बोलला व त्या आजोबांना ढकलत पुन्हा बोलतो, “गप्प बस” व गौरवकडे बघत “ए पुढे येऊ नको, नाहीतर मी हिला खरच गोळी घालील” गौरव पुढे येतच जातो व पुढे येता येता बोलतो, “खुशाल मार, मला काही फरक पडत नाही, ती माझी कोणीच लागत नाही, पण तिला मारल्यानंतर मात्र मी तुला जिवंत सोडणार नाही.” हे बोलत असताना गौरव पुढे पुढे येत जातो व रस्त्यात चाकू लागून पडलेला दरोडेखोर हाताने चाकू धरून विव्हळत असतो, गौरव त्याच्या चाकूवर पायाने दाब देतो तसा तो दरोडेखोर जोरजोरात ओरडायला लागतो, हे बघून बंदूक धरलेला दरोडेखोर खूप घाबरून जातो, त्याची ही अवस्था बघून चाकूवर पायाने आणखी जोर देत समोरच्या दरोडेखोराला बोलतो, “तुला जिवंत रहायचं असेल तर तिला सोड, नाहीतर तुझं तू ठरव, तुझी मर्जी...” असं बोलल्यावर दरोडेखोर थोड्याश्या विचारात पडतो, तेवढ्यात गौरव दरोडेखोराजवळ जाऊन त्याची बंदूक धरून परीच्या डोक्यावरुन काढून वर करतो, तसा दरोडेखोर अजून घाबरून जातो, तो अर्धगळीत होऊन थरथरत उभा राहतो. तसा गौरव त्याच्या तोंडावर पंच मरतो व त्याच्या हातातील बंदूक हिसकाऊन घेतो. दरोडेखोराच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागते. दरोडेखोर तोंडावरील रक्त पुसतो, ते रक्त बघून तो दरोडेखोर अजून घाबरतो, पण काही कळायच्या आत गौरव पोटात जोरात किक मरतो तसा तो दरोडेखोर पाठीमागची खिडकीची काच फोडून बाहेर जाऊन लांब पडतो.
                                    [.....उर्वरित पुढील भागात.....]
 
जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर Like, Subscribe आणि follow जरूर करा. व इतरांनाही Share करा.

If you want to read this story in English click here 

ये कहाणी हिन्दीमे पढणे के लिये यहा क्लिक करे

बदला (भाग २)

बदला भाग २             हा सर्व प्रकार बघून बाहेरचे दरोडेखोर भांबावून जातात, त्यांना आतमध्ये काय चाललय ते कळतच नाही. तेवढ्यात गौरव बसमधून बाह...